करोनामुळे श्रीरामपुरातील महिलेचा मृत्यू
सार्वमत

करोनामुळे श्रीरामपुरातील महिलेचा मृत्यू

तालुक्यात नवीन 19 बाधित रुग्ण; 23 जण बरे होऊन घरी परतले

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील मोरगेवस्ती भागात राहणार्‍या एक 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत करोनामुळे 7 जण मयत झाले आहेत. या महिलेबरोबरच या महिलेच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात नवीन 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 227 वर जावून पोहोचली आहे.

सदर 50 वर्षीय महिलेवर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला पॅरेलीससचा झटका आल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान ती महिला कोमात गेली. काहीकाळ ती शुध्दीवर आल्यावर तिच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. मात्र उपचार सुुरू असतानाच काल तिचा मृत्यू झाला.

या महिलेवर काल सकाळी नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत सर्व नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेच्या मृत्यूमुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मयत झालेल्या रुग्णाचा आकडा 7 वर जाऊन पोहोचला आहे.

काल दुपारी आलेल्या अहवालातील अँटीजेन चाचणीत काल 10 रुग्ण आढळून आले आहेत तर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 9 अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात एकूण 19 रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 227 वर जावून पोहोचली आहे. तसेच करोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी 23 रुग्ण काल बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये 53 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आंबेडकर वसतिगृहात 33 जणांना ठेवण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com