श्रीरामपुरात करोनाने एका महिलेचा मृत्यू
सार्वमत

श्रीरामपुरात करोनाने एका महिलेचा मृत्यू

श्रीरामपूर तालुक्यात 15 करोनाबाधित रुग्ण

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

करोनावर उपचार सुुरू असताना नगर येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेे तालुक्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. तर काल श्रीरामपूर तालुक्यात नव्याने 15 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या 331 वर जाऊन पोहोचली असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

सदरची महिला ही उत्सव मंगल कार्यालय परिसरात राहत असून तिला मंगळवारी त्रास जाणवू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान तिच्यात करोनाची काही लक्षणे आढळून आल्याने तिच्यावर उपचार सुरू केले मात्र तिची तब्येत पहाता तिला तातडीने नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. काल तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा येथील ग्रामीण रुग्णालयात सेवेत आहे.

काल आंबेडकर वसतिगृहातील करोना सेंटरमध्ये रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. काल 69 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 54 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 71 जणांपैकी 23 जणांंना बरे वाटत असल्यामुळे घरी सोडण्यात आले. त्यामुळे 48 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत.

कालच्या 15 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये वॉर्ड नं. सात मधील-1, अशोकनगर व एस. टी. कॉलनी प्रत्येकी दोन म्हणजे 4 रुग्ण, थत्ते मैदान 2, उदय पॅलेस परिसर 2, खंडाळा 3, भोकर 1 यारुग्णाचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 1881 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 331 रुग्ण करोनाबाधित असून 807 रुग्ण ांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com