corona
corona
सार्वमत

श्रीरामपुरात 19 जण पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. काल 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात करोना पॉझिटिव्हचा आकडा 189 वर जावून पोहोचला आहे. काल 60 जणांचे रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 45 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. 11 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.

काल पॉझिटिव्ह अहवालात आलेल्या 19 जणांमध्ये सरस्वती कॉलनीतील 4 जण असून त्यात तिघे हे एकाच कुटुंबातील आहेत. वॉर्ड नं. 4 मधील दोघे जणही एकाच कुटुंबातील आहेत. दळवी वस्ती भागातील याआधी पॉझिटिव्ह आलेला रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एकजण पॉझिटिव्ह आला आहे.

वडाळा महादेव येथील दोघेजण असून यापूर्वी त्यांच्याच कुटुंबातील चौघेजण पॉझिटिव्ह आले आहेत. बेलापूर येथील प्रतिष्ठीत घरातील दोघेजण पॉझिटिव्ह आले आहेत. दत्तनगर येथील चार जण पॉझिटिव्ह आले असून यातील दोघेजण एकाच कुटुंबातील आहेत. सराला बेटचेही दोघेही एकाच कुटुंबातील आहेत.

मुळा-प्रवरा परिसरातील एकजण पॉझिटिव्ह आहे. दरम्यान, एका नामांकित बँकेचा मॅनेजरही पॉझिटिव्ह आढळल्याने या बँकेला सील करण्यात आले होते. हा अधिकारी नगरहून येऊन जाऊन करतो.

तालुक्यात याअगोदर 170 पॉझिटिव्ह होते. काल आलेल्या 19 पॉझिटिव्ह अहवालामुळे ती संख्या आता 189 वर जावून पोहोचली आहे. 806 जणांनी घशाचे स्त्राव तपासले असून 503 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. संतलुक हॉस्पिटलमध्ये आता 60 जण उपचार घेत आहेत. तर 20 जण हे आंबेडकर वसतिगृहात दाखल आहेत. काल 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com