श्रीरामपूर तालुक्यात 12 पॉझिटीव्ह
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 12 पॉझिटीव्ह

तीन पोलिसांचा समावेश । 53 अहवाल निगेटीव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

काल आंबेडकर वसतीगृहात करण्यात आलेल्या 65 रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात 12 रुग्ण करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात तीन पोलिसांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 250 वर जावून पोहोचली आहे.

काल दुपारी रॅपीड टेस्ट मध्ये 65 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 12 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 53 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 250 वर जावून पोहोचले आहे. तसेच करोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी 23 जण काल बरे होवून घरी परतले आहेत.

करोना पॉझिटीव्ह रुग्णात मोरगे वस्तीवरील 4, वॉर्ड नं. सातमध्ये 1, वॉर्ड नं.चार-1, वॉर्ड नं. दोन 1, म्हाडा परिसर 3, बेलापूर-2, असे 12 रुग्ण आहेत.

सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये 68 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आंबेडकर वसतिगृहात 42 जणांना ठेवण्यात आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 1014 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 250 वर जावून पोहोचली आहे. तर 668 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. ज्या परिसरात रुग्ण आढळले त्या भागात व परिसरात नगरपालिकेच्यावतीने सॅनिटायर फवारणी तसेच जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com