श्रीरामपूर तालुक्यात केवळ 4 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 4 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 4 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात

काल कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नाही. यात जिल्हा रुग्णालयात एकही रुग्ण नाही. फक्त खासगीत 04 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2421 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 6 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 33 जण उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 7520 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2421 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. काल येथील 3 रुग्णांना अन्य रुग्णालयांत उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com