श्रीरामपूर तालुक्यात 18 करोना पॉझिटिव्ह
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 18 करोना पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|shrirampur

काल आंबेडकर वसतिगृहात 75 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून श्रीरामपूर तालुक्यात 18 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 316 वर जाऊन पोहोचली आहे.

काल दुपारी रॅपीड टेस्ट तपासणीत 75 जणांची तपासणी करण्यात आली. 18 करोना बाधित आढळून आले आहेत. तर 57 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच करोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी 9 रुग्ण बरे होऊन काल घरी परतले आहेत.

करोना पॉझिटिव्ह रुग्णांत सुभाष कॉलनी 3, वडाळा महादेव 2, वॉर्ड नं. 7 -8, बेलापूर 2, गोंधवणी 1, खंडाळा 2 असे 18 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये 39 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आंबेडकर वसतिगृहात 12 जणांना क्कारंटाईन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 1291 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 316 वर जावून पोहोचली आहे. तर 753 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

पंचायत समितीचे कामकाज तीन दिवस बंद

नगर येथून दररोज ये-जा करणारा पंचायत समितीचा एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे काल दुपारी श्रीरामपूर पंचायत समितीत सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. तसेच परिसरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली.तसेच पंचायत समितीचे कामकाज तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सभापती सौ. संगीता शिंदे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com