34 पॉझिटिव्ह
34 पॉझिटिव्ह
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 6 पॉझिटिव्ह

24 जण जिंकले

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात 6 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह तर 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 171 वर जावून पोहोचली आहे.

वॉर्ड नं. 7 मधील मुळा-प्रवरा परिसरात राहत असलेल्या एका 70 वर्षीय वृध्देचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याच कुटुंबातील सदस्यांचे स्त्राव तपासले असता त्यांच्या कुुटुंबातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रेल्वे कॉलनीत राहणार्‍या एका इसमाचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील बेलापूर येथील एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काल 24 लोकांचे स्त्राव घेण्यात आले. तर 22 लोकांना घरी सोडण्यात आले आहेत. आतापर्यंत तालुक्यात 758 लोकांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. त्यातील 171 जणांचे पॉझिटीव्ह आले असून 476 लोकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

दरम्यान रविवारी तालुक्यातील 24 लोकांनी करोनावर मात केली आहे. त्यात श्रीरामपूर येथील करोना उपचार केंद्रातून 19 करोना मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com