श्रीरामपूर : 283 जणांना डिस्चार्ज

196 नवीन करोनाबाधित; 1355 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर : 283 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून काल तालुक्यात 196 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1355 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 283 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 144 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 52 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 8750 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 6319 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 39 तर ग्रामीण भागात 138 असे 177 आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 19 रुग्ण असून असे एकूण 196 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील वॉर्ड नं. 1-09, वॉर्ड नं. 2-01 वॉर्ड नं. 3-05, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-04 तर वॉर्ड नं. 7-18 असे शहरात 39 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-09, ऐनतपूर-02, उक्कलगाव-07, गळनिंब-04, कुरणपूर-03, फत्याबाद-01, कडीत बुद्रुक-01, पढेगाव-10, मालुंजा-02, लाडगाव-04, कान्हेगाव-01, भेर्डापूर-06, कारेगाव-03, मातापूर-04, उंबरगाव-01, वळदगाव-01, टाकळीभान-05, कमालपूर-01, घुमनदेव-01, खिर्डी-02, वांगी बुद्रुक-01, उंदिरगाव-01, हरेगाव-02, माळेवाडी-14, निमगाव खैरी-07, , खंडाळा-02, शिरसगाव-09, गोंडेगाव-02, मातुलठाण-01, माळवाडगाव-08, भामाठाण-11, खोकर-03, मुठेवागाव-04, वडाळा महादेव-03, अशोकनगर-02 असे 138 करोनाबाधित रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 19रुग्ण असून असे एकूण 196 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com