श्रीरामपूर तालुक्यात काल 229 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात काल 229 करोनाबाधित रुग्ण
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून काल तालुक्यात 229 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.काल 1404 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 252 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 51, खासगी रुग्णालयात 143 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 35 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 8000 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 5520 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com