श्रीरामपुरात 11 करोनाबाधित रुग्ण

दोन पोलिसांसह कारागृहातील 5 कैद्यांचा समावेश
श्रीरामपुरात 11 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरात काल 70 जणांची तपासणी केली असता 11 जण करोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 395 वर पोहोचला आहे. यात दोन पोलिसांसह 5 कैद्यांचा समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

काल आलेल्या अहवालांत 11 पॉझिटिव्ह तर 59 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आजपर्यंत 233 जणांनी करोनावर मात केली तर काल 11 जणांंना बरे वाटत असल्यामुळे घरी सोडण्यात आले. 49 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरू आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 40 जण उपचार घेत आहेत.

काल निघालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये श्रीरामपूर कारागृहातील 5, मोरगे वस्ती 2, दत्तनगर 3, पढेगाव 1, बेलापूर 1 असे रुग्णाचा समावेश आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2137 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 395 रुग्ण करोनाबाधित आढळले असून 985 रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com