श्रीरामपूर तालुक्यात 34 बाधित
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 34 बाधित

सबजेलमधील 17 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 109 जणांची तपासणी करण्यात आली असून यात 34 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सबजेलमधील 17 जणांचा समावेश आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 365 वर जाऊन पोहोचली आहे.

काल केलेल्या चाचणीत 75 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 11 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. काल 40 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरू आहेत.

तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 30 जण क्वारंटाईन करण्यात आले आहे. काल निघालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये वॉर्ड नं. सहा मधील-2, वॉर्ड नं. तीनमधील 1 खंडाळा 2, नेवासा रोड 2, पढेगाव 1, बेलापूर 3, सबजेल 17 या रुग्णाचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 1990 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 365 रुग्ण करोनाबाधित आढळले असून 882 रुग्ण हे बरे झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 वर जावून पोहोचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com