करोना अपडेट
करोना अपडेट|Digi
सार्वमत

श्रीरामपुरात 19 नवे करोना रुग्ण

तुरुंगातही करोनाचा शिरकाव

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कालही पुन्हा 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. श्रीरामपूर शहरातील तुरुंगातही करोनाचा शिरकाव झाला असून चार कैद्यांनाही करोना झाला आहे. त्यामुळे तालुक्यात करोना पॉझिटिव्हचा आकडा 208 वर जावून पोहोचला आहे.

काल 60 जणांचे रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या असून त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 45 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 11 रुग्ण हे बरे होवून घरी परतले आहेत.

शहरातील संजयनगर भागात 2, वॉर्ड नं. 1 मध्ये एक, वॉर्ड नं. 2 एक, वॉर्ड नं. 4 मध्ये चार जण व श्रीरामपूर तुरुंगातील चार आरोपींचा यात समावेश आहे. हे चार आरोपी वॉर्ड नं. 1 व वॉर्ड नं. 2 मधील प्रत्येकी एक तर संजय नगरमधील दोघांचा समावेश आहे. वॉर्ड नं. 4 मधील सहाही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. तर बेलापूर येथील एकाच कुटुंबातील 9 जण पॉझिटिव्ह असून त्यांचे खासगी लॅबमधून आले आहेत.

काल एकूण 40 लोकांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले असून त्यातील 10 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 30 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघेजण करोना वर मात करून घरी परतले आहेत.

आतापर्यंत 846 जणांचे घशाचे स्त्राव तपासण्यात आले असून यातील 208 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 533 अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान सोमवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन रुग्ण सराला बेटावरील नसून ते सराला गाव परिसरातील असल्याचे सांगण्यात आले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com