श्रीरामपूर : 23 जण करोनाबाधित

युवानेता, व्यापारी आणि शेतकरी कुटुंबांना घेरले
श्रीरामपूर : 23 जण करोनाबाधित

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

राष्ट्रवादीचे माजी जिल्हा पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील पाच जणांसह श्रीरामपूर शहर व तालुक्यात 23 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह तर 30 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 165 वर पोहोचली आहे.

राष्ट्रवादीचे माजी जिल्हा पदाधिकारी यांच्यासह माजी नगरसेविका असलेली त्यांची पत्नी, मुलगी, भाऊ व भावजई असे पाच जणांचा रॅपीड टेस्टमध्ये करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भळगट हॉस्पिटलच्या मागे राहत असलेले एक व्यापारी, अशोकनगर राऊत वस्तीवरील एकाच कुटुंबातील तीन जण, बेलापूर, फत्याबाद, व पढेगाव येथील प्रत्येकी 1 अशा 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या युवा नेत्याने परवा एका वाढदिवसाला हजेरी लावली होती. त्यांच्या सोबत सहकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह इतर काही राजकीय मंडळी होती. त्यापैकी काहींनी काल स्वतःहून आपले स्त्राव तपासणीसाठी दिले असून आज त्यांचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे.

सायंकाळी नगरहून आलेल्या 24 अहवालांतील 11 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 13 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये बेलापूर बुद्रुक येथील पाण्याच्या टाकी परिसरातील एकाच घरातील 4, बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बन रस्त्यावरील एकाच घरातील 3, दशमेशनगर येथील एकाच घरातील चार जण असे 11 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

काल 16 जणांचे स्त्राव घेण्यात आले त्यापैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच त्यातील 11 व नगरहून आलेल्या अहवालापैकी 19 असे 30 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 23 पॉझिटीव्ह अहवालात 14 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 746 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले असून त्यातील 165 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 467 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 91 अहवालाची प्रतिक्षा आहे.

असे आहेत करोनाबाधित

- शहरातील राष्ट्रवादीच्या माजी युवा पदाधिकार्‍यासह माजी नगरसेविका,

- दशमेशनगर येथील व्यापार्‍याच्या एकाच कुटुंबातील चार जण, भळगट हॉस्पिटल मागे राहणारा व्यापारी,

- बेलापूर बुद्रुक येथील पाण्याच्या टाकी परिसरातील एकाच घरातील 4,

- बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बन रस्त्यावरील एकाच घरातील तिघे पॉझिटिव्ह आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com