श्रीरामपूर तालुक्यात 14 करोना पॉझिटिव्ह
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 14 करोना पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 14 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात रॅपिड टेस्टमधील 8 तर नगरहून आलेले 6 अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे कालपर्यंत श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा 138 वर जावून पोहोचला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

श्रीरामपुरात दररोज दोन अंकी रुग्ण सापडत असून संशयितांचे अहवाल येण्यास उशिर लागत आहेत. दि. 14 जुलै रोजी आरोग्य विभागाने शहरात शिबिर घेतले. यावेळी संशयितांच्या घेतलेल्या स्वॅबमधील काल हे 8 पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल आठ दिवसांनंतर हे अहवाल आले आहेत. तर नगर येथील अहवालात 6 जणांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण करोना रुग्णांचा आकडा 138 वर जावून पोहोचला आहे.

या 14 जणांमध्ये वॉर्ड नं. 1 मध्ये दोन, वॉर्ड नं. 2 मध्ये चार, वॉर्ड नं. 6 मध्ये दोन, वॉर्ड नं. 7 मध्ये दोन, बेलापूर, खंडाळा, महांकाळवाडगाव, तर प्रभातमधील एका रुग्णाचा समावेश आहे. काल 56 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत.

या परिसरात सापडलेल्या करोना बाधितांमुळे परिसरातील अनेकांनी स्वत:हून या शिबिराला हजेरी लावली व आपले स्राव तपासणीसाठी दिले. याचा अहवाल दि. 21 जुलै रोजी आला. त्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर 22 जुलै रोजी आलेल्या अहवालात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. श्रीरामपूर करोना उपचार केंद्रातून उपचार घेऊन 56 जण घरी परतले. सध्या 50 जणांवर येथे उपचार सुरू असल्याची माहिती करोना उपचार केंद्राचे नोडल ऑफिसर डॉ. वसंत जमधडे यांनी दिली.

आतापर्यंत 681 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. त्यापैकी 418 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर आतापर्यंत 138 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com