श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 23 बाधित
सार्वमत

श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 23 बाधित

खंडाळ्यात सासू-जावई, एकूण करोनाबाधितांची संख्या 125

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरासह तालुक्यात काल 23 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 125 वर पोहोचली आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 , सोशल क्लब येथे घेण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट करोना तपासणी अहवालात 101 अहवालापैकी 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच वॉर्ड नं. 1, महात्मा फुले हौसिंग सोसायटी परिसरातील तीन जणांसह वॉर्ड नं. 2 मधील दोघे पती-पत्नीसह एकजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

वॉर्ड नं. 7 मोरगे वस्ती येथील एक, चौथाणी हॉस्पिटलजवळ एक महिला, दत्तनगर येथील एक पुरुष, तालुक्यातील खंडाळा येथील एक जण मुंबई येथे नोकरीस होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या अंत्यविधीस खंडाळा येथून काहीजण गेले होते. ते परत आल्यानंतर 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यावेळी त्यांचे स्त्राव घेण्यात आले होते. काल त्याचा अहवाल आला. त्यात मयत झालेल्याची पत्नी तसेच त्यांचा जावई हे दोघे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

अन्य अहवाल आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भोकर येथील रुग्ण दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा मुलगा असून तो त्यांच्याबरोबर दवाखान्यात होता. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वॉर्ड नं. 4 मधील एकाच कुुटुंबातील चारजण असून वॉर्ड नं. 6 मधील एका प्रतिष्ठीत घरातील दोघे, तर अन्य दोघे असे चार, बेलापूर, इंदिरानगर, दत्तनगर येथील प्रत्येकी एक असे दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अनेकांनी कोणतीही लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

येथे सापडले रूग्ण

वॉर्ड नं. 1, वॉर्ड नं. 2-3, वॉर्ड नं. 4-4 वॉर्ड नं. 6-4, वॉर्ड नं. 7- 3

बेलापूर-1, दत्तनगर 1, इंदिरानगर 1.

काल एकूण 16 अहवाल निगेटिव्ह आले असून यात माजी नगराध्यक्ष यांचा समावेश आहे. आज 15 स्त्राव घेतले असून आजपर्यंत 626 स्त्राव घेण्यात आले आहेत. आंबेडकर वसतिगृहात 57 जण क्कारंटाईन असून संतलूक हॉस्पिटलमध्ये 47 जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण 125 जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर कोरोना उपचार केंद्रातून उपचार घेऊन 52 जण घरी परतले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com