श्रीरामपूर : करोनाबाधितांचे शतक
सार्वमत

श्रीरामपूर : करोनाबाधितांचे शतक

15 नवे रुग्ण, राजकीय पदाधिकार्‍याचे कुटुंबातील सदस्य, वॉर्ड नं. 2, फातेमा हौसिंग सोसायटी, रेव्हेन्यू कॉलनी, मोरगे वस्तीचा समावेश

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात करोनाची साखळी सलग चालू असल्यामुळे आता तालुक्यातील करोनाबाधितांची संख्येने शतक पूर्ण केले आहे. काल शहरात 15 जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात वॉर्ड नं. 2 मध्ये 5, फातेमा हौसिंग सोसायटीत 5 तर रेव्हेन्यू कॉलनीत 4, व मोरगे वस्ती येथे 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात चार पुरुष, 9 महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

रविवारी 142 करोना अहवाल प्रतिक्षेत होते. या अहवालापैकी एकूण 47 अहवाल आले असून यात 15 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 31 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या पॉझिटीव्ह आलेल्या 15 अहवालात रेव्ह्येन्यू कॉलनीतील 4 रुग्ण हे एका कुटुंबातील असून त्या कुटुंबातील एक जण शनिवारी मध्यरात्री पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

वॉर्ड नं. 2 मधील पाच पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. या दोन्ही कुटुंबातील दोघे जण पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांनी वॉर्ड नं. 2 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅपीड तपासणी शिबिरात त्यांचे स्त्राव घेतले होते. तर फातेमा हौसिंग सोसायटीतील हे दोन्ही रुग्ण नवे असून ते दोघेही स्वतःहून तपासणीसाठी गेले असता या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

रात्री उशिरा या सोसायटीतील आणखी तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर मोरगे वस्ती येथील नवशक्ती चौकातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे हा भाग तातडीचे सील करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 611 जणांचे घशाचे स्त्राव तपासण्यात आले असून यात 100 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले असून 358 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com