श्रीरामपूर तालुक्यात नवीन 247 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 247 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा दिलासा मिळाला असून काल तालुक्यात 247 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1427 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 170 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 14 खासगी रुग्णालयात 218 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 15 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 7771 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 5268 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

यात श्रीरामपूर शहरात 107 तर ग्रामीण भागात 108 रुग्ण असे 215 तर 32 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-17, वॉर्ड नं. 2-05, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 4-08 वॉर्ड नं. 5-04, वॉर्ड नं. 6-15, वॉर्ड नं. 7-56 असे 108 तर ग्रामीण भागात बेलापूर-16, उक्कलगाव-04, गळनिंब-02, फत्याबाद-02, कडीत बुदुक-01, पढेगाव-02, मालुंजा-01, भेर्डापूर-03, कारेगाव-04, मातापूर-02, उंबरगाव-03, टाकळीभान-06, भोकर-03, खिर्डी-01, उंदिरगाव-01, ब्राम्हणगाव-01, हरेगाव-06, माळेवाडी-01, महांकाळवाडगाव-03, सराला-02, निमगाव खैरी-02, दिघी-01, गोंधवणी-05, दत्तनगर-02, खंडाळा-02, शिरसगाव-07, गोंडेगाव-03, माळवाडगाव-01, खोकर-05, मुठेवाडगाव-02, वडाळामहादेव-09, निपाणीवडगाव-03, अशोकनगर-02, असे 108 तर अन्य तालुक्यातील 32 रुग्ण यात पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.