श्रीरामपूर तालुक्यात 225 रुग्णांची करोनावर मात

श्रीरामपूर तालुक्यात 225 रुग्णांची करोनावर मात

118 करोनाबाधित रुग्ण; 1014 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 118 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 225 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 118 रुग्ण सापडले आहे. तर 1014 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 225 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 06 खासगी रुग्णालयात 81 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 31 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 225 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1014 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 6028 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 3928 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1014 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 60 तर ग्रामीण भागात 45 अन्य 13 असे 118 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-11, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं.-02, वॉर्ड नं. 6-08, वॉर्ड नं. 07-35 असे 60 तर ग्रामीण भागात मातापूर-06, ऐनतपूर-01, शिरसगाव-03, बेलापूर-10, भेर्डापूर-02, उंदिरगाव-04, वडाळा महादेव-04, खैरीनिमगाव-02, लाडगाव-01, उंबबरगाव-07, वळदगाव-01, निपाणीवडगाव-02, अशोकनगर-02, असे 45 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 13 रुग्ण आहेत.

सध्या श्रीरामपूर तालुक्यातबरे होवून घरी जाणार्‍यांची संख्य वाढली आहे. तसेच करोना बाधित रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात दिलासादायक वातावरण असले तरी अनेक भागात अँटीजन चाचणी होत नसल्यामुळे करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. अँटीजन चाचणीचे किट नसल्यामुळे अनेक ठिकाणी अँटीजन चाचणी होत नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com