आठवडाभरानंतर श्रीरामपूर तालुक्यातील करोना रुग्णांची आकडेवारी दोन अंकी झाली

बरे होवून घरी जाणारे 237 तर केवळ 98 करोनाबाधित
आठवडाभरानंतर श्रीरामपूर तालुक्यातील करोना रुग्णांची आकडेवारी दोन अंकी झाली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या आठवडाभरात करोनाने थैमान घातले होते. आठ दिवसांपासून तीन अंकी 150 पेक्षा जास्त सख्या असलेल्या

करोनाबाधितांची संख्या काल दोन अंकी म्हणजे 98 वर आली. मात्र बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या काल 237 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

काल 98 रुग्ण सापडले आहेत. तर 1045 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 237 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 07 खासगी रुग्णालयात 22 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 69 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 237 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1045 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 4482 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 2348 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1045 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 10 तर ग्रामीण भागात 74 अन्य 14 असे 98 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-05, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-02, वॉर्ड नं. 0-02 असे 10 तर ग्रामीण भागात ऐनतपूर-01, गोंडेगाव-03, फत्याबाद-01, कारेगाव-01,उक्कलगाव-05, मालुंजा-06, शिरसगाव-02, उंदिरगाव-01, महांकाळवाडगाव-04, ब्राम्हणगाववेताळ-07, माळेवाडी-02, निमगाव खैरी-06, भेर्डापूर-04, भोकर-02, टाकळीभान-01, मुठेवाडगाव-01, वडाळा महादेव-01, दत्तनगर-02, खंडाळा-03, दिघी-01, नायगाव-01,वळदगाव-04, रामपूर-06, कान्हेगाव-01, उंबरगाव-01, मातापूर-02, गोंधवणी-02, कमालपूर-01, मातुलठाण-01, पढेगाव-01 असे एकूण 74 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 14 रुग्ण आहेत.

गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळेपासून कालपर्यंत तीन अंकी संख्या म्हणजे 150 संख्येच्यावर रुग्ण होते. मात्र काल अचानक केवळ 98 रुग्ण आढळून आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. बरे होऊन जाणार्‍यांचे प्रमाण दिलासादायक राहिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com