श्रीरामपूर तालुक्यात काल 243 करोनाबाधित रुग्ण

विकेंड लॉकडाऊनमध्येही रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय
श्रीरामपूर तालुक्यात काल 243 करोनाबाधित रुग्ण
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 243 रुग्ण सापडले आहे.त तर 830 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 55 ,खासगी रुग्णालयात 31 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 157 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 105 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 830 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 3459 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1542 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या एकूण अंदाजे 830 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

करोनाबाधित रुग्णांमध्ये शहरात 61 रुग्ण असून ग्रामीण भागात 169 असे 230 तर अन्य तालुक्यातील 13 अशी 243 रुग्ण संख्या आहे. शहरातील वॉर्ड नं.-1-09, वॉर्ड नं.-2-02, वॉर्ड नं.-3-07, वॉर्ड नं.-4-04, वॉर्ड नं.-5-07, वॉर्ड नं.-6-12, वॉर्ड नं.-7-25 असे 61 रुग्ण तर ग्रामीण भागात उक्कलगाव-02, पढेगाव-05, खिर्डी-03, मांडवे-05, गोंधवणी-15, शिरसगाव-02, भोकर-03, गोंडेगाव-06, मालुंजा-04, बेलापूर-19, अशोकनगर-04, मुठेवाडगाव-03, टाकळीभान-03, एकलहरे-02, ऐनतपूर-02, खोकर-01, वडाळा महादेव-03, कान्हेगाव-23, खंडाळा-01, महांकाळवाडगाव-02, हरेगाव-06, उंदिरगाव-26, भेर्डापूर-02, फत्त्याबाद-01, दिघी-04, निमगाव खैरी-04, उंबरगाव-01, माळेवाडी-06, नाऊर-02, अशोकनगरफाटा-01 असे 169 तर अन्य तालुक्यांतील 13 असे 243 रुग्ण आढळून आले आहेत.

करोना रुग्णांची सद्य परिस्थिती

श्रीरामपूर तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या तिनही वसतीगृहात एकूण 500 बेडची क्षमता असताना या ठिकाणी 157 रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी 343 बेड शिल्लक आहेत. ग्रामीण रुग्णालयात 45 बेडची क्षमता असून या ठिकाणी 44 रुग्ण उपचार घेत असून 1 बेड शिल्लक आहे. अन्य सहा रुग्णालयात 235 बेडची क्षमता असून त्या ठिकाणी 222 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 13 बेड शिल्लक आहेत. श्रीरामपूर तालुक्यात 357 बेड शिल्लक असतानाही गेल्या दोन दिवसापासून श्रीरामपूर तालुक्यातील रुग्णांंना नगर, पुणे, नाशिक, संगमनेर, राहुरी तालुक्यात उपचारासाठी पाठविले जात आहे. बाहेरील तालुक्यात 68 रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाने मृत्यू झालेला रेशो 0.32 टक्के इतका आहे. ग्रामीण भागात 11 ठिकाणी तर शहरात 6 ठिकाणी कन्टेंटमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. तपासणी करण्यात आलेल्यामध्ये आरटीपीसीआर 5197, आरएटी 4799 असे एकूण 9996 तपासण्या झाल्या असून यात 3668 करोनाबाधित आढळून आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com