श्रीरामपूर तालुक्यात 7 जण करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 7 जण करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल श्रीरामपूर तालुक्यात 45 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून यात 7 जण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा 747 वर जाऊन पोहचला आहे.

श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 45 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात 7 जण करोनाबाधित तर 38 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत.

काल आढळून आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये हरेगाव -1, बेलापूर-1, गुजरवाडी-1, वॉर्ड नं. सात-3, वॉर्ड नं. सहा- 1 असे रुग्ण आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 3093 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 747 जण पॉझिटिव्ह तर 1572 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. आजपर्यंत 16 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

श्रीरामपूर येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी काल 9 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com