श्रीरामपूर तालुक्यात 21 पॉझिटीव्ह
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 21 पॉझिटीव्ह

दोन पोलिसांचा समावेश; 82 अहवाल निगेटीव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

काल आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या 103 रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात 21 जणांचे करोना अहवाल पॉझिटीव्ह तर 82 जण निगेटीव्ह आले आहेत. यात दोन पोलिसांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या 238 वर जावून पोहोचली आहे. तर 11 रुग्ण काल बरे होवून घरी परतले आहेत.

करोना पॉझिटीव्ह रुग्णात सुभाष कॉलनीतील 8, मोरगे वस्ती 4, वॉर्ड नं.चार-2, म्हाडा परिसर 1, वॉर्ड नं. दोन मध्ये 1, वॉर्ड नं. 7 मध्ये 1, बेलापूर-1, नरसाळी-1, निमगाव खैरी-1 रुग्णांचा समावेश आहे.

सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये 56 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आंबेडकर वसतिगृहात 40 जणांना क्कारंटाईन करण्यात आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 949 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 238 वर जावून पोहोचली आहे. तर 615 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

ज्या परिसरात रुग्ण आढळले त्या भागात व परिसरात नगरपालिकेच्यावतीने तत्काळ सॅनिटायर फवारणी तसेच जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com