श्रीरामपूर तालुक्यात नवीन 18 करोना रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 18 करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 18 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 71 असून हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर 14 जणांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला आहे.

काल जिल्हा रुग्णालयात 03, खासगीत 13 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen testing) 02 असे 18 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 16638 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive Patient) झाली होती. तर त्यातील सुमारे 16567 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 02 तर ग्रामीण भागात 16 असे एकूण 18 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 7-01 असे 02 शहरात तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-04, बेलापूर खुर्द-01, नरसाळी-01 कारेगाव-02, नायगाव-02, सराला-01, मातापूर-01, खानापूर-02, शिरसगाव-01, गळनिंब-01 असे ग्रामीण भागात 16 आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com