श्रीरामपूर तालुक्यात 67 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

14 बाधित; 09 जणांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 67 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 14 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 67 वर जाऊन पोहोचली. हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 11 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 03 असे 14 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 16620 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. तर त्यातील सुमारे 16553 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur) 01 तर ग्रामीण भागात 13 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-00 असे एकूण 14 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-03, नरसाळी-02 भेर्डापूर-01, कारेगाव - 01, मातापूर-02 माळेवाडी-01, नायगाव-01, माळवाडगाव-02 असे ग्रामीण भागात 13 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com