श्रीरामपूर तालुक्यात 157 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

22 रुग्ण करोनाबाधित; 12 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 157 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. 157 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 12 होती.

खासगी रुग्णालयात 04 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 18 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15765 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 15621 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात काल वॉर्ड नं. 1-09, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 6 -03, वॉर्ड नं. 7-03 असे 17 तर ग्रामीण भागात बेलापूर-01, टाकळीभान-01, खानापूर- 01 असे 03 रुग्ण आहेत.श्रीरामपूर शहरात कालची रुग्णसंख्या 17 असून ग्रामीण भागात 03 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 02 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. ग्रामीण भागात केवळ 3 रुग्ण आढळल्याने करोना संसर्गाबाबतीत दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे(Taluka Medical Officer Dr. Mohan Shinde) यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com