श्रीरामपूर तालुक्यात काल 127 करोनाबाधित रुग्ण

बेलापूर व कारेगावात प्रत्येकी 13 तर शहरात 33 रुग्णांचा समावेश
श्रीरामपूर तालुक्यात काल 127 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 127 रुग्ण सापडले आहेत. तर 807 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

काल 150 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यातील कारेगाव व बेलापुरात प्रत्येकी 13 रुग्ण तर उंबरगावात 11 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 37 खासगी रुग्णालयात 31 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 59 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 150 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 807 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 3586 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1692 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या एकूण अंदाजे 807 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

करोनाबाधित रुग्णांमध्ये शहरात 33 रुग्ण असून ग्रामीण भागात 87 असे 120 तर अन्य तालुक्यांतील 7 अशी 127 रुग्ण संख्या आहे. शहरातील वॉर्ड नं.-1-08, वॉर्ड नं.-3-07, वॉर्ड नं.-4-03, वॉर्ड नं.-6-01, वॉर्ड नं.-7-14 असे 33 रुग्ण तर ग्रामीण भागात वडाळा महादेव-03, गोंधवणी-09, उंबरगाव-11, उक्कलगाव-03, बेलापूर-13, मातापूर-01, पढेगाव-01, खंडाळा-01, वांगी-01, ऐनतपूर-04, गोंडेगाव-02, कारेगाव-13, दत्तनगर-02, ब्राम्हणगाववेताळ-02, नायगाव-01, माळवाडगाव-02, उंदिरगाव-01, टाकळीभान-01, अशोकनगर-02, निपाणीवडगाव-01, माळेवाडी-01, मालुंजा-01, भेर्डापूर-01, दिघी-01, निमगाव खैरी-01, मुठेवाडगाव-01, मातुलठाण-03, शिरसगाव-04 असे 87 तर अन्य तालुक्यांतील 7 असे 127 रुग्ण आढळून आले आहेत.

आता रुग्णांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही

श्रीरामपूर तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या तिनही वसतिगृहांत एकूण 500 बेडची क्षमता असताना त्याठिकाणी उपचार केले जात नव्हते. कालपर्यंत श्रीरामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील खासगी कोव्हिड सेंटर फुल्ल झाले होते. त्यामुळे या रुग्णांना बाहेरील तालुक्यात जावे लागत होते. आता मात्र याठिकाणी सोय झाल्याने रुग्णांना याठिकाणी उपचार मिळणार आहेत. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असून आवश्यक ती साधनेही पुरविली आहेत. त्यामुळे याठिकाणी कोव्हिडचे रुग्ण उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठी गैरसोय दूर झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com