श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या दहा ते बारा दिवसांत राज्यात करोनाने उच्छाद मांडला आहे. काल श्रीरामपूर तालुक्यातही करोना रुग्णांची संख्या वाढली असून

श्रीरामपूर करोनाच्याबाबतीत पाच नंबरवर येऊन पोहोचले आहे. काल एकाच दिवसात तालुक्यात 52 रुग्ण आढळून आले आहेत.

काल श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात 15, खासगी रुग्णालयांमध्ये 31 तर अँटीजेन चाचणी तपासणीत 06 असे 52 रुग्ण आढळून आले आहेत. तर करोनाचे उपचार करून एकूण 21 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या दहा दिवसांत सुमारे 354 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 194 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या एकूण अंदाजे 160 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.