श्रीरामपूर तालुक्यात 13 जण करोनाबाधित

करोना
करोना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 13 रुग्ण करोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 3048 पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 39 जणांची रॅपीड तपासणी करण्यात आली. यात केवळ 6 जण पॉझिटिव्ह तर 33 जण निगेटिव्ह आढळले. जिल्हा रुग्णालयात 6 तर खासगी प्रयोगशाळेतील 1 असे 13 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत.काल 39 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत.

काल एकूण 26 जणांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 04 रुग्ण उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 12027 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com