श्रीरामपूर तालुक्यात 18 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 18 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरात काल 61 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून यात शहरातील 18 जण करोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे आजपर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 498 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. काल 21 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 61 जणांची तपासणी करण्यात आली. यात 18 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 43 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. संतलुक हॉस्पिटलमध्ये 37 रुग्ण उपचार घेत आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 29 जण उपचार घेत आहेत.

काल पॉझिटिव्ह आलेल्या 18 जणांमध्ये वॉर्ड नं. एकमध्ये 8, वॉर्ड नं. सातमध्ये 1, गोंधवणी 2, सिंधी कॉलनी 3, टाकळीभान 2, म्हाडा कॉलनी 1, डावखर मळा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2418 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 498 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1200 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तर आजपर्यंत 11 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com