श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपुरातील कोव्हिड सेंटरमध्ये केलेल्या तपासणीत हे 10 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 438 वर जाऊन पोहोचला आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 49 जणांची तपासणी करण्यात आली असून यात 10 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 39 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आतापर्यंत उपचार 289 जण बरे झाले असून काल 26 जणांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. काल 41 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 35 जण उपचार घेत आहेत.

काल निघालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नं. एक मध्ये 1, बेलापूर 1, म्हाडा 2, निपाणी वडगाव 2, संगमनेररोडवर 2, गोंधवणीरोड 1, बोरावकेनगर 2 असे 10 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2278 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 459 रुग्ण करोनाबाधित आढळले असून 1087 रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 वर जावून पोहोचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com