श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे तीन बळी

एकाच दिवसात विक्रमी 92 रुग्णांची वाढ
श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे तीन बळी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यात नव्याने काल एकाच दिवसात विक्रमी 92 रुग्णांची नोंद झाली आहे.

तर एक डॉक्टर पत्रकार, एक वृध्द व एका पोलिसाच्या आईचा करोनाने बळी घेतला असून तालुक्यातील बळींची संख्या 28 झाली आहे.

श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 59 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली यात 28 जण पॉझिटिव्ह तर 32 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

तर खासगी प्रयोगशाळेत 64 जण पॉझिटिव्ह असे कालच्या एका दिवसात तब्बल 92 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा 1276 वर जाऊन पोहचला आहे.

काल 38 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 96 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 8 जणांना श्रीरामपूरहून दुसर्‍या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

काल रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांत वॉर्ड नं. दोन-1, वॉर्ड नं. पाच-2, वॉर्ड नं. सहा-1, वॉर्ड नं. सात-5, इंदिरानगर-4, खंडाळा-1, कोल्हार-1, बेलापूर-4, उक्कलगाव 3, टाकळीभान 1, देवळाली प्रवरा 2, निपाणीवडगाव 1, वडाळा महादेव 1 व सुतगिरणी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 3042 जणांची चाचणी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com