श्रीरामपुरात करोनाचा दहावा बळी
सार्वमत

श्रीरामपुरात करोनाचा दहावा बळी

तालुक्यात 24 पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीवर राहणार्‍या करोना बाधित असलेल्या एकाचा उपचार सुरू असताना नगर येथे मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 10 वर पोहोचली आहे.

काल घेण्यात आलेल्या तपासणीत श्रीरामपूर तालुक्यातून 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 68 जणांची तपासणी करण्यात आली असून यात 24 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 384 वर जाऊन पोहोचली आहे.

काल आंबेडकर वसतिगृहातील करोना सेंटरमध्ये 68 रॅपीड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 44 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 11 जणांंनी करोनावर मात केल्यामुळे काल त्यांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंतच्या 233 जणांनी करोनावर मात केली आहे. 49 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 40 जण क्कारंटाईन करण्यात आले आहे.

काल पॉझिटीव्ह निघालेल्या रुग्णांमध्ये गोंधवणी 3, पढेगाव 4, वॉर्ड नं. सात 4, वढणे वस्ती 1, खंडाळा 1, आशिर्वाद नगर 1, संगमनेर रोड 1, इंदिरानगर 2, नेवासा रोड 2, वॉर्ड नं. तीन 1, वॉर्ड नं. सहा 1, वॉर्ड नं. सात 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2067 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 384 रुग्ण करोनाबाधित आढळले असून 926 रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर जावून पोहोचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com