श्रीरामपूर तालुक्यात 128 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

16 रुग्ण करोनाबाधित; 17 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 128 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 16 करोनाबाधित रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. 128 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 17 होती.

खासगी रुग्णालयात 08 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 08 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur) गेल्या काही दिवसांत सुमारे 15672 रुग्णांना करोनाची लागण (Corona) झाली होती. तर त्यातील सुमारे 15544 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-01 तर ग्रामीण भागात कारेगाव-01, टाकळीभान-02, हरेगाव-01, दत्तनगर-01, शिरसगाव-02, मुठेवाडगाव-02, असे 09 रुग्ण आहेत.

श्रीरामपूर शहरात केवळ 04 रुग्ण असून ग्रामीण भागात 09 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 03 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 16 करोनाबाधित रुग्ण (corona Positive Patient) आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com