श्रीरामपूर तालुक्यात 16 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 16 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 16 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात

काल रॅपीड 102 तर खासगी ठिकाणी 5 जणांची अशी 107 जणांची तपासणी करण्यात आली असून यात जिल्हा रुग्णालयात 02, खासगीत 01 तर रॅपीडमध्ये 13 असे 16 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत करोनाबाधितांचा आकडा 2417 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल एकूण 15 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 39 जण उपचार घेत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल 107 जणांची तपासणी करण्यात आली यात 16 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 91 जणांचे अहवाल निगेटीव्ह आढळले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये रॅपीड तपासणीत 11 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात वॉर्ड नं. दोन-1, बेलापूर बुद्रुक-1, कुरणपूर-1, हरेगाव-1, टाकळीभान-1, वडाळा महादेव-2, मालुंजा-4 याठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 7520 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून कालपर्यंत 2417 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. काल येथील 2 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com