करोनाबाधित रुग्णसंख्या
करोनाबाधित रुग्णसंख्या
सार्वमत

श्रीरामपुरात दोन करोनाबाधित रुग्ण

11 जणांचे स्त्राव घेतले तर 142 अहवालांची प्रतीक्षा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरात काल दोघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 86 वर जावून पोहोचली आहे. काल 11 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहे.

काल पॉझिटिव्ह अहवाल आलेले हे दोघेही वॉर्ड नं. 2, बजरंग चौकातील आहेत. आतापर्यंत तालुक्यातून 569 जणांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. 325 जण निगेटीव्ह आले आहेत. 145 अहवाल प्रतिक्षेत असून 42 रुग्ण संतलूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर 35 जण डॉ. आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड केंद्रात आहेत.

शनिवारी सायंकाळी तालुक्यात 12 करोना बाधित रुग्ण सापडले होते. रात्री उशिरा शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याला त्रास होऊ लागला. त्यांना श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांची तेथे तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आले. त्यांना तीन चार दिवसांपासून त्रास होत होता.

त्यामुळे सुरक्षितता म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना नगरला पाठवण्यात आले. तर एका मतिमंद रुग्णालाही करोनाची बाधा झाली. त्याला इतरही औषधे सुरू आहेत. म्हणून त्याला नगरला पाठवण्यात आले होते. मात्र त्याला पुन्हा श्रीरामपुरातील करोना उपचार केंद्रात माघारी पाठवण्यात आले. मात्र त्याला दाखल करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाने दिरंगाई केली होती.

याबाबत करोना उपचार केंद्राचे नोडल ऑफिसर डॉ. वसंतराव जमधडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सदर रुग्णाला इतरही सोयी लागणार असल्याने त्याला नगरला पाठवण्यात आले होते. त्याच्यासोबत आम्ही सर्व पेपर दिले होते. मात्र त्याला त्यांनी परत माघारी पाठवले. मात्र त्याच्यासोबत संदर्भीय कागदपत्रे दिले नाही. म्हणून त्याला दाखल करून घ्यायला दिरंगाई झाली. आपल्याला भ्रमणध्वनी आल्यावर आपण स्वतः येऊन त्याला पुन्हा दाखल केले असून त्याला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com