श्रीरामपूर तालुक्यात 49 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 49 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल श्रीरामपूर तालुक्यात नव्याने 49 जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1734 वर जाऊन पोहोचली आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल केवळ 1 जणाची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून यात तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. नगर येथे चाचणीत 22 तर खासगी प्रयोग शाळेत 28 असे कालच्या एका दिवसात 49 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

4 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 78 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 4061 जणांची चाचणी करण्यात आली असून यात आतापर्यंत 1734 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 34 आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com