करोना
करोना
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 19 करोना पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील काल 57 जणांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 19 जण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एका पक्षाच्या जिल्हा पदाधिकार्‍याचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 555 वर जाऊन पोहोचली आहे.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 57 जणांची तपासणी करण्यात आली. यात 19 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 38 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. काल उपचार घेणार्‍यांपैकी 13 जण बरे होऊन घरी परतले आहेत. संतलुक हॉस्पिटलमध्ये 39 रुग्ण तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 33 जण उपचार घेत आहेत.

काल पॉझिटिव्ह आलेल्या 19 जणांमध्ये वॉर्ड नं. एकमध्ये 7, वॉर्ड नं. तीनमध्ये 1, वॉर्ड नं. सहा 5, वॉर्ड नं. सातमध्ये 1, वळदगाव 4, घोगरगाव 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2664 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 555 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1339 जण निगेटिव्ह आढळून आली आहेत. तर आजपर्यत 14 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com