श्रीरामपूर तालुक्यात 123 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

20 नवीन करोनाबाधित; 15 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 123 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampu) काल 20 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळून आले आहेत. काल 123 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार (Treatment in hospitals) घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 15 होती.

जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 09 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 09 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15704 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. तर त्यातील सुमारे 15581 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-02, वॉर्ड नं. 7-03 असे 7 तर ग्रामीण भागात बेलापूर-02, निमगाव खैरी-02, शिरसगाव-01, नायगाव-02, निपाणीवडगाव-01 असे 08 रुग्ण आहेत.

श्रीरामपूर शहरात केवळ 07 रुग्ण असून ग्रामीण भागात 08 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असे 05 रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण 20 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com