श्रीरामपूर तालुक्यात नवीन 13 करोनाबाधित

123 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 35 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात नवीन 13 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर 9Shrirampur) तालुक्यात काल केवळ 13 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले आहेत. काल 123 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 35 होती. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

खासगी रुग्णालयात ( Private Hospital) 11 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 02 असे एकूण 13 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15513 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14845 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7-02 असे 02 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-01, खानापूर-01, मुठेवाडगाव-02 असे 4 रुग्ण आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) शहरात केवळ 2 रुग्ण असून ग्रामीण भागात 4 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असे 7 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 13 करोनाबाधित रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत.

आज कोविशिल्डचे लसीकरण

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे आज शनिवार दि. 26 जून 2021 रोजी कोविशिल्ड या लसीचा दुसर्‍या डोससाठी लसीकरण सत्र आयोजित केले आहे.लसीकरणासाठी पात्र लाभार्थी यांनी आज सकाळी 09:00 वाजता यावे. 45 वयाच्या पुढील लोकांनी दुसर्‍या डोससाठी ज्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com