श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल केवळ 4 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात काल रॅपीड तपासणी करण्यात आली नाही.

खासगीत 04 जण पॉझिटीव्ह आढळून आले. तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 2992 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. श्रीरामपूर येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये 21 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 08 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 11988 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून त्यात 2992 जण करोनाबाधित आढळून आले आहेत.