करोना
करोना
सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात 29 करोना पॉझिटिव्ह

तहसील पाठोपाठ प्रांत कार्यालयातही करोनाची एन्ट्री

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील काल 88 जणांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 29 जण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 536 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान तहसील पाठोपाठ प्रांताधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्‍यासही करोनाची बाधा झाली आहे.

उपचार घेणार्‍यांपैकी काल 26 जण बरे होऊन घरी परतले आहेत. संतलुक हॉस्पिटलमध्ये 33 रुग्ण उपचार घेत आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 30 जण उपचार घेत आहेत.

काल पॉझिटिव्ह आलेल्या 29 जणांमध्ये वॉर्ड नं. एकमध्ये 10, वॉर्ड नं. तीनमध्ये 4, वॉर्ड नं. चारमध्ये 6, वॉर्ड नं. सातमध्ये 4, चितळी 1, वडाळा महादेव 3, नांदूर 1, भोकर 1, अशोकनगर 4, खंडाळा 1 अशा येथील ठिकाणच्या लोकांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2607 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 536 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1336 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तर आजपर्यत 14 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

भोकर येथील रुग्णाला अगोदरपासूनच त्रास होत होता. त्याने श्रीरामपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेवून पुन्हा घरी आला व नंतर दोन दिवसांनी शिर्डी येथे गेला असता त्यांना तेथे तो करोना सदृष्य असल्याचे जाणवले. त्यास पुन्हा श्रीरामपूर येथे पाठविले. श्रीरामपूर येथे रॅपीड टेस्ट मध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला.

येथील प्रांत कार्यालयातील एक कर्मचारी श्रीरामपूर येथे घेण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट मध्ये काल सोमवारी बाधित आढळून आला. काल पुन्हा तहसील व प्रांत कार्यालयातील कर्मचारी व अधिकार्‍यांची रॅपीड टेस्ट केली असता पुन्हा प्रांत कार्यालयातील आणखी एक जण करोना बाधित आढळून आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com