करोनाने श्रीरामपुरात वृध्दाचा मृत्यू
सार्वमत

करोनाने श्रीरामपुरात वृध्दाचा मृत्यू

दोन दिवसांत तालुक्यात 18 पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील एका प्रसिध्द व्यापारी वृध्दाचा काल नगर येथे उपचार सुरू असताना करोनामुळे मृत्यू झाला. तसेच दोन दिवसांत 34 जणांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या त्यात 18 जण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 502 वर तर मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे.

काल 23 जण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील 80 वर्षीय एका वृध्दाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे श्रीरामपुरात संत लूक हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना पुन्हा नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार चालू असताना काल त्यांचा मृत्यू झाला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या रॅपीड टेस्टमध्ये 34 जणांची तपासणी करण्यात आली. यात 18 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 16 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

संतलुक हॉस्पिटलमध्ये 33 रुग्ण उपचार घेत आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 26 जण उपचार घेत आहेत.

दोन दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या 18 जणांमध्ये वॉर्ड नं. एकमध्ये 1, वॉर्ड नं. सातमध्ये 4, गोंधवणी 8, पढेगाव 1, मोरगे वस्ती 1, टिळकनगर 1, वॉर्ड नं. दोन 1 व अन्य 1 या ठिकाणच्या लोकांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2452 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 502 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 1234 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com