सार्वमत

श्रीरामपूर तालुक्यात सात पॉझिटिव्ह

बेलापूर, गळनिंब, अशोकनगर, भोकर, रेव्हु. कॉलनी येथे प्रत्येकी एक तर वॉर्ड नं. 7 मध्ये दोन रुग्ण

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात बेलापूर, गळनिंब, अशोकनगर, भोकर, श्रीरामपूर शहरातील रेव्ह्युनी कॉलनी येथे प्रत्येकी एक तर वॉर्ड नं. 7 या ठिकाणी दोन जणांचे करोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यातील चार जणांने सरकारी तर तीन जणांनी खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात 72 पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत.

बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालात 22 रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात भोकर येथे आलेली व्यक्ती ठाणे येथे तो टोलनाक्यावर काम करत असतो. हा 9 तारखेला भोकर येथे आला.

त्याला सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्याने तो शहरातील एका रुग्णालयात गेला मात्र त्याला तेथे दाखल करून न घेतल्याने तो नगर येथील एका खासगी रुग्णालयात गेला परंतु त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात त्याचे स्त्राव घेतले. त्याचा अहवाल काल पॉझिटीव्ह आला. तसेच अशोकनगर, बेलापूर खुर्द, गळनिंब तसेच शहरातील रेव्ह्युनी कॉलनी येथील येथील प्रत्येकी एक तर वॉर्ड नं. 7 मधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात दोन महिला व चार पुरुष आहेत. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 72 वर जावून पोहोचली आहे. यातील 15 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर काल 23 लोकांचे स्त्राव घेण्यात आले आहेत. आतापर्यंत 521 जणांचे स्त्राव तपासण्यात आले असून यात 72 पॉझिटिव्ह तर 294 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 145 अहवालांची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत तालुक्यात तीन जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या 7 जणांच्या कुटुंबिय व त्यांच्या संपर्कात असलेल्यांना आज ताब्यात घेवून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com