श्रीरामपूर तालुक्यात 194 जणांना डिस्चार्ज

168 करोनाबाधित रुग्ण; आज लसीकरण सुरु; 1363 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 194 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 168 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1363 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 194 होती.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 104 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 64 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 12863 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 11302 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-08, वॉर्ड नं. 2-04, वॉर्ड नं. 3-04 वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-04 तर वॉर्ड नं. 7-17 असे शहरात 39 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-16, उक्कलगाव-03, फत्याबाद-03, मांडवे-02, पढेगाव-12, भेर्डापूर-07, कारेगाव-10, मातापूर-01, उंबरगाव-02, वळदगाव-01, टाकळीभान-09, भोकर-03, वांगी बुद्रुक-01, गुजरवाडी-01, ब्राम्हणगाव-01, निमगाव खैरी-02, गोंधवणी-05, दत्तनगर-05, खंडाळा-02, शिरसगाव-11, नाऊर-01, ज़ाफराबाद-03, माळवाडगाव-03, खोकर-04, अशोकनगर-09, असे 111 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 39 ग्रामीण 111 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 18 रुग्ण असून असे एकूण 168 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

फोनद्वारे संपर्क केलेल्या व्यक्तींनाच लसीकरण

आज गुरुवार दि. 20 मे 2021 रोजी आगाशे हॉल, आझाद मैदान कोव्हिड-19 लसीकरण केंद्र श्रीरामपूर येथे कोव्हॅक्सिन या लसीच्या 140 डोससाठी लसीकरण सत्र आयोजित आयोजित करण्यात आले आहे. नगरपालिका श्रीरामपूर येथून लसीकरण सत्रासाठी फोनद्वारे संपर्क साधलेला आहे. अशाच नागरिकांनीच उपस्थित राहायचे आहे. उर्वरित नागरिकांनी ज्यांना संपर्क साधला गेलेला नसेल त्यांनी लसीकरण केंद्रावर जावू नये अथवा गर्दी करू नये. लवकरच पात्र लाभार्थी प्राधान्य क्रमांकानुसार आपल्याला कोव्हिड -19 लसीकरण साठी संपर्क साधला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com