करोनाचा श्रीरामपूर तालुक्यात कहर

391 करोनाबाधित रुग्ण; 1534 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
करोनाचा श्रीरामपूर तालुक्यात कहर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 391 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1534 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 226 होती.

जिल्हा रुग्णालयात 05 खासगी रुग्णालयात 315 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 71 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 12290 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 10637 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-39, वॉर्ड नं. 2-16 वॉर्ड नं. 3-06, वॉर्ड नं. 6-07 तर वॉर्ड नं. 7-39 असे शहरात 107 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-35, ऐनतपूर-01, नरसाळी-02, एकलहरे-04, उक्कलगाव-04, गळनिंब-03, कुरणपूर-03, फत्याबाद-21, लाडगाव-05, कान्हेगाव-01, भेर्डापूर-10, कारेगाव-12, मातापूर-12, उंबरगाव-04, वळदगाव-01, टाकळीभान-16, भोकर-04, खिर्डी-01, उंदिरगाव-14, ब्राम्हणगाव-03, हरेगाव-08, माळेवाडी-06, निमगाव खैरी-06, गोंधवणी-01, दत्तनगर-08, खंडाळा-04, शिरसगाव-18, नाऊर-01, जाफराबाद-06, गोंडेगाव-05, माळवाडगाव-04, भामाठाण-12, खोकर-03, मुठेवाडगाव-04, वडाळा महादेव-23,निपाणीवडगाव-03, अशोकनगर-02, असे 270 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 107, ग्रामीण 270 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 14 रुग्ण असून असे एकूण 391 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर आज रविवार दि. 16 मे 2021 रोजी सकाळी 9 वाजता कोव्हॅक्सीन या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्‍या डोसची मुदत संपली असेल अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर आधारकार्ड व मोबाईल क्रमांकासहीत उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी केले आहे. आज दुसर्‍या डोससाठी केवळ 150 जणांना लस दिली जाणार असून रांगेतील पहिल्या 150 जणांंना या डोसचा लाभ मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदरचे लसीकरण 45 वर्षांपुढील नागरिकांचे केले जाणार आहे. ज्यांचे 28 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला असेल त्यांचेच लसीकरण केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com