श्रीरामपूर तालुक्यात 101 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 101 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 101 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची संख्या काल 112 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. काल 101 रुग्ण सापडले आहे. तर 1232 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 112 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 51जखासगी रुग्णालयात 25 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 25 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 112 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 1232 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 5796 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 3478 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1232 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 37 तर ग्रामीण भागात 57 अन्य 07 असे 101 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-08,वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-02, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-09, वॉर्ड नं. 07-16 असे 37 तर ग्रामीण भागात शिरसगाव-11, भेर्डापूर-01, भोकर-03, दत्तनगर-06, वडाळा महादेव-05, निमगाव खैरी-02, मुठेवाडगाव-01, नायगाव-13, महांकाळवाडगाव-01, हरेगाव-01, अशोकनगर-02, निपाणीवडगाव-01, मातापूर-02, खंडाळा-03, पढेगाव-01, वळदगाव-04 असे 57 तर बाहेर तालुक्यातील तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले असे एकूण 07 रुग्ण आहेत.

पालिकेतील अँटीजन चाचणी किट नसल्यामुळे बंद

सध्या करोनाचा संसर्ग वाढत असून त्यासाठी ठिकठिकाणी अँटीजन तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तपासणी करण्याचे काम सुरु होते. येथील पालिका रुग्णालयातही अँटीजन चाचणी तपासणी सुरु होती. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून अँटीजन चाचणी बंद आहे. त्यामुळे शहरातील कोविड तपासणी थंडावली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या कमी दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने किटची व्यवस्था करुन पालिकेतील अँटीजन चाचणी तपासणी सुरु करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सध्या करोनाविषयीची आकडेवारी पहाता बरे होणार्‍यांचे प्रमाण अधिक असून त्याचबरोबर करेाना रुग्ण कमी होण्याचे प्रमाण दिसून येत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात होते. मात्र तपासणीच बंद असल्यामुळे करोनाबाधितांचा आकडा कमी दिसत आहे. तालुक्यातही काही ठिकाणी अँटीजन तपासणी बंद आहे, त्या ठिकाणीही अँटीजन चालू करण्याबाबत काय अडचणी आहेत त्या सोडवून त्या ठिकाणीही अँटीजन चाचणी तपासणी सुरु करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com