श्रीरामपूर तालुक्यात 647 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

19 करोनाबाधितांची भर; 28 रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 647 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल नवीन 19 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता 647 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 28 होती.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 14 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 05 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15392 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 14605 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात- वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 7-02 असे 04 तर ग्रामीण भागात बेलापूर-02, उक्कलगाव-01, कारेगाव-01 मालुंजा-01, हरेगाव-01, गोंधवणी- 01, नाऊर-5, खोकर-01, मुठेवाडगाव-01, वडाळामहादव-े 01, अशोकनगर -01 असे एकूण 15 रुग्ण आढळून आले आहेत.

काल शहरात 04 करोनाबाधित रुग्ण तर ग्रामीण भागात 15 रुग्ण असे 19 रुग्ण आढळून आले.

आज कोविशिल्डचे लसीकरण

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणारे आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्र, श्रीरामपूर येथे आज शुक्रवार दि. 18 जून 2021 रोजी कोविशिल्ड या लसीच्या दुसर्‍या डोससाठी लसीकरण सत्र आयोजित असून लसीकरणासाठी पात्र लाभार्थी यांनी आज सकाळी 09:00 वाजता यावे. आरोग्य विभाग, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्याचे वय 45 पेक्षा जास्त आणि पहिला डोस घेऊन 84 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे अशा नागरिकांना लस देण्यात येणार आहे. सदर दुसर्‍या डोससाठी ज्यांना नगरपालिका श्रीरामपूर यांच्याकडून फोनद्वारे संपर्क साधला गेलेला आहे त्यांनीच लसीकरणासाठी यावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com