श्रीरामपूर तालुक्यात 320 जणांना डिस्चार्ज

71 करोनाबाधित रुग्ण; 1092 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात 320 जणांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 71 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालअखेर 1092 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 320 होती.

जिल्हा रुग्णालयात 00 खासगी रुग्णालयात 43 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 28 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 14726 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 13514 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरात वॉर्ड नं. 1-12, वॉर्ड नं. 2-04, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 4-02, वॉर्ड नं. 6-02, वॉर्ड नं. 7-08 असे शहरात एकूण 31 रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-04, बेलापूर खुर्द-03, एकलहरे-02, गळनिंब-01, फत्याबाद-01, भेर्डापूर-02, कारेगाव-05, वळदगाव-01, वांगी बुद्रुक-01, उंदिरगाव-01, ब्राम्हणगाव-01, सराला-02, गोंधवणी-02, दत्तनगर-04, शिरसगाव-01, जाफराबाद-01, गोंडेगाव-01, निपाणी वडगाव-03, असे एकूण 37 रुग्ण आढळून आले आहेत.

काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरात 31 तर ग्रामीण भागात 37 रुग्ण असून तर जे अन्य तालुक्यातील तसेच ज्यांची नावे व फोन नंबर चुकीचे आहेत असे अन्य03 रुग्ण असे एकूण तालुक्यात 71 रुग्ण आढळून आले आहेत. काल करोनाबाधितांची संख्या पुन्हा कमी झाल्याने दिलासा मिळाला. तर बरे हाऊन घरी जाणार्‍यांची संख्या जास्त झाल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे काल अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1092 वर जावून पोहोचली असून हे रुग्ण श्रीरामपूर, जिल्हा तसेच जिल्हाबाहेरील रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज बुधवार दि. 02 जून 2021 रोजी लसीकरण बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे. विचारपूस करण्यास लसीकरण केंद्रावर जाऊ नये. पुढील नियोजित लसीकरण सत्राची माहिती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com