श्रीरामपूर तालुक्यात 226 करोनाबाधितांची भर

श्रीरामपूर तालुक्यात 226 करोनाबाधितांची भर

92 जणांना डिस्चार्ज; 1188 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 226 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1188 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 92 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात 08 खासगी रुग्णालयात 171 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 47 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 13658 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 12266 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-20, वॉर्ड नं. 2-04, , वॉर्ड नं. 6-07 तर वॉर्ड नं. 7-27 असे शहरात 58 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर-09, ऐनतपूर-02, बेलापूर खुर्द-04, उक्कलगाव-08, गळनिंब-01, पढेगाव-03, मालुंजा-01, लाडगाव-02, भेर्डापूर-02, कारेगाव-06, टाकळीभान-18, भोकर-03, खिर्डी-02, वांगी बुद्रुक-01, गुजरवाडी-04, उंदिरगाव-02, बाम्हणगाव-04, पाचवाडी-02, माळेवाडी-04, निमगाव खैरी-03, दिघी-01, गोंधवणी-04, दत्तनगर-05, शिरसगाव-13, नाऊर-05, गोंडेगाव-05, माळवाडगाव-14, भामाठाण-03, खोकर-03, मुठेवाडगाव-01, वडाळामहादेव-05, निपाणीवडगाव-04, अशोकनगर-03 शहरात एकूण 58 ग्रामीण 142 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 19 रुग्ण असून एकूण 226 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

काल तालुक्यात करोनाबाधित रुग्णांनी डोके वर काढल्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. काल 226 रुग्ण आढळून आले आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे करोना रुग्णांचा रेशो रेट आपोआपच वाढला गेला आहे. काल केवळ 97 रुग्णांनी डिस्चार्ज घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण हे 1188 आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतरच श्रीरामपूर तालुक्यात दिलासादायक असे वातावरण राहू शकेल.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज मंगळवार दि. 25 मे 2021 रोजी लसीकरण बंद राहील. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com