श्रीरामपूर तालुक्यात 182 जणांना डिस्चार्ज
करोना

श्रीरामपूर तालुक्यात 182 जणांना डिस्चार्ज

143 करोनाबाधित रुग्ण; 1389 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल तालुक्यात 143 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1389 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 182 होती.

जिल्हा रुग्णालयात 02 खासगी रुग्णालयात 77 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 64 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 12695 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 11188 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-11, वॉर्ड नं. 3-04 वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-01 तर वॉर्ड नं. 7-05 असे शहरात 29 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-11, एकलहरे-02, गळनिंब-06, कुरणपूर-02, पढेगाव-01, मालुंजा-02, लाडगाव-01, भेर्डापूर-04, कारेगाव-09, मातापूर-03, उंबरगाव-04, वळदगाव-01, टाकळीभान-04, भोकर-03, उंदिरगाव-02, हरेगाव-10, माळेवाडी-03, निमगाव खैरी-04, गोंधवणी-11, दत्तनगर-03, खंडाळा-02, शिरसगाव-06, नाऊर-05, गोंडेगाव-02, माळवाडगाव-01, खोकर-04, निपाणीवाडगाव-02, असे 112 करोनाबाधित रुग्ण आहेत.

शहरात एकूण 22, ग्रामीण 59 तर अन्य तालुक्यातील तसेच ज्यांचे मोबाईल नंबर व नावे चुकीचे आहेत असे 22 रुग्ण असून असे एकूण 143 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज लसीकरण बंद

ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर अंतर्गत असणार्‍या श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज बुधवार दि. 19 मे 2021 रोजी लसीकरण बंद राहील, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com